रविंद्र चव्हाण यांच्या महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन

महायुतीच्या दिग्गज नेत्यांनी दिले विजयी भवचे आशीर्वाद

जय श्रीराम, भारत माता की जय घोषणांची नारेबाजी

डोंबिवली: महायुतीचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचा शानदार शुभारंभ रविवारी रामनगर येथे बोडस मंगल कार्यालयाच्या आवरात करण्यात आला. 

त्यावेळी महायुतीचे मंत्री रवींद्र चव्हाण,  शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कल्याण ग्रामीणचे उमेदवार राजेश मोरे, महापौर विनिता राणे, विश्वनाथ राणे,  शशिकांत कांबळे, पद्माकर कुलकर्णी, राहुल दामले, नाना सूर्यवंशी, मंदार हळबे, मोरेश्वर भोईर, रा स्व संघ समन्वयक आशीर्वाद बोंद्रे, विंदा नवरे, डॉ मिलिंद शिरोडकर, प्रज्ञेश प्रभुघाटे, संदीप पुराणिक, सुरेश पुराणिक, विनोद काळण, खुशबू चौधरी यांसह मान्यवर उपस्थित होते.

सगळ्याच मान्यवरांनी विजयी भव असे आशीर्वाद देऊन मंत्री चव्हाण यांचा विजय असल्याचे म्हंटले.

सातत्याने निवडणूक विषयात राज्यभर प्रवास करणाऱ्या मंत्री चव्हाण यांना इथली चिंता ठेवू नका असे म्हणत सगळ्यानी जय श्रीराम अशा घोषणा सुरू झाल्या. 

या घोषणांचा नाद विजयापर्यन्त घुमतच राहणार असे सांगताच प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून रवी दादा आगे बढोच्या घोषणा दिल्या.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट